मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पेट्रोल हे 95 रुपयांच्या पुढे विकले जात असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी आज गुरुवारी इंधन दर स्थिर ठेवले. पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज जैसे थेच आहे.
यापूर्वी मंगळवारी पेट्रोल 22 पैशांनी तर डिझेल 23 पैशांनी प्रतिलिटर स्वस्त झाले होते. गेल्या आठवड्यातही इंधनाच्या दरात 2 वेळा कपात करण्यात आली. एप्रिल महिन्यासाठी स्वयंपाकाचा गॅस देखील प्रति सिलिंडर 10 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. अवघ्या काही दिवसांपूर्वी पेट्रोलचे दर कमी झाले होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अशात इंधनाच्या दरांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत.
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे भाव
नवी दिल्ली : 90.56 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 96.98 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 90.77 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 92.58 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 88.91 रुपये प्रतिलीटर
देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव
नवी दिल्ली : 80.87 रुपये प्रतिलीटर
मुंबई : 87.96 रुपये प्रतिलीटर
कोलकाता : 83.75 रुपये प्रतिलीटर
चेन्नई : 85.88 रुपये प्रतिलीटर
नोएडा : 81.33 रुपये प्रतिलीटर

