आजचा दिवस भारतीयांसाठी क्रांतिकारक -खासदार रक्षाताई खडसे

0

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील नगरपरीषदेच्या दवाखान्यात आज शनिवार १६ जानेवारी रोजी कोविड लसीकरणास रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. यावेळी नगरपालिकेतील कर्मचारी आणि आशा वर्कर यांना पहिल्यांदा कोवीड लस देण्यात आली.

यावेळी बोलताना खासदार रक्षाताई खडसे म्हणाल्या की भारतातील शास्त्रज्ञ व प्रशासनाने खूप मेहनत घेतल्याने आज ही महत्त्वाची लस आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आजचा दिवस हा देशवासियांसाठी खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा प्रशासनाच्या वतीने ही लस आरोग्य क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दिली जात आहे. प्रशासनाच्या वतीने खूप काळजी आणि मेहनत घेऊन नियोजन करण्यात आलेले आहे, याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार असल्याचे मत लसिकरणाचे प्रसंगी खासदार रक्षाताई खडसे यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.