भुसावळ (प्रतिनिधी)- वरणगाव आचेगाव ता.भुसावळ येथील रहिवाशी व भोपाळ येथील इंडीयन इन्सटीट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च सेंटर (आईसर) येथे कार्यरत असलेले डॉ. नितीन पाटील यांनी रसायनशास्त्र या विषयातील केलेल्या संशोधनाबद्दल द नॅशनल अॅक्याडमी ऑफ सायन्सेस, इंडीया या संस्थेने फेलोशिप प्रदान करून नुकताच गौरव केला. या यशाबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
विज्ञान व सामाजीक क्षेत्रात उच्च कामगीरी करणाऱ्या भारतातील नामवंत संशोधनकांना राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त द नॅशनल अॅक्याडमी ऑफ सायन्सेस या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात येतो डॉ. नितीन पाटील यांनी आवर्त सारणीतील मुलद्रव्यांच्या संप्रेरके म्हणुन उपयोग करून विविध प्रकारच्या रासायनिक अभिक्रीयांचा वापर करण्याचे व विविध प्रकारची नैसर्गीक मुलद्रव्य आणि त्यांचे अनुरूप मुलद्रव्य तयार करण्यावर त्यांचे संशोधन कार्य केले आहे.
१२० पेक्षा जास्त शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जनरल मधे प्रसिध्द झाले आहेत. तर अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शना खाली पीएचडी पदवी संपादन केली आहे.या कार्याची दखल घेवून. नुकतेच विज्ञान दिना निमित्त त्यांना फेलोशिप देवून गौरव करण्यात आला. या यशाबद्दल श्री शारदा शिक्षण मंडळ दिपनगर तालुका भुसावळ या संस्थेचे अध्यक्ष रमेश निवृत्ती गाजरे यांनी कौतुक केले आहे