आचार्य ग.र.गरूड माध्यमिक विद्या व क.महा. शेंदुर्णी विद्यालयात शा.पो.आ.वितरण संपन्न

0

शेंदुर्णी | वार्ताहर 

येथील आचार्य ग र गरूड माध्यमिक विद्या व क महाविद्यालयात शासनाच्या धोरणानुसार शा.पो.आ.वितरण संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयराव गरूड यांच्या शुभहस्ते शुभारंभ करून करण्यात आले. लाॅकडाऊन प्रक्रियेला बाधा येवू न देता सोशल डिस्टंसिंगचे पालन करून, तोंडावर मास्क/रुमाल बांधून, सॅनेटायझरचा वापर करून शिस्तबद्ध व नियोजनबध्द पध्दतीने तांदूळ व कडधान्ये यांचे वितरण करण्यात आले. वितरण सुरू असताना संस्थेचे सचिव आदरणीय श्री सागरमलजी जैन, सहसचिव भाऊसाहेब दिपक गरूड, माजी पं.स.समिती उपसभापती सुधाकरअण्णा बारी, संस्थेचे संचालक दादासाहेब यू यू पाटील, संजय देशमुख सर, केंद्रप्रमुख कुमावत सर,पत्रकार आदींनी भेट देऊन वाटप नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य एस्. पी.उदार, उपमुख्याध्यापक आर एस् चौधरी, पर्यवेक्षक आर.एस् परदेशी, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.