आचारसंहितेच्या काटेकोर अंमजबजावणीसाठी पथकांनी जबाबदारीने काम करावे

0

चाळीसगाव:- आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथके व स्थिर देखरेख पथके स्थापित करण्यात आली असून आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजासाठी या पथकांनी जबाबदारीने काम करावे, अशा सुचना 17 चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद पवार यांनी दिल्या.

भरारी पथक, स्थायी पथक, पोलिस विभाग यांची बैठक 17 चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस तहसिलदार अमोल मोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय ठाकुरवाड, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे, मेहुणबारे पोलीस ठाणेचे पोलिस निरिक्षक जयपाल हिरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे, निवासी नायब तहसिलदार नानासाहेब आगळे उपस्थित होते.

पथक प्रमुखांनी संशयीत चारचाकी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करावी. यासाठी नेमुन दिलेल्या ठिकाणांवर बॅरेकेट्स लावावे. आचारसंहिता भंगाची तक्रार आल्यास ती आचारसंहिता कक्षास सादर करावी. आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील तक्रारीची माहिती आपणास मिळाली असेल ती नोंदवून सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करावी. दिलेल्या आदेशानुसार सर्व पथकांनी कामकाज करावे, अशा सुचनाही सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी यावेळी दिल्या.

मेहुणबारे, ग्रामीण, शहर पोलीस ठाणे अंतर्गत भरारी पथक व स्थिर देखरेख पथके स्थापित करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक प्रमुख चार पोलीस, एक व्हीडीओग्राफर असून पथक प्रमुखांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचा दर्जा देण्यात आला आहे. प्रत्येक पथकास एक वाहन देण्यात आले आहे. गुन्हा घडल्याची माहिती 25 शब्दात सादर करावयाची असल्याने गुन्हा व त्याचे कलम याबाबतची माहिती पथक प्रमुखांना देण्यात आली.

यावेळी पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.