आचारसंहिता शिथीलच्या सूचना नाहीत

0

विशेष महासभेबाबत निर्णय घेणे अवघड
जळगाव | प्रतिनिधी
दुष्काळी परिस्थितीत पाणी प्रश्नी आचारसंहिता शिथील असल्याबाबत नुसत्याच गप्पा मारल्या जात आहेत. मात्र महानगरपालिका प्रशासनाला आचारसंहिता शिथील झाल्याच्या लेखी सूचनाच प्राप्त झालेल्या नसून त्यामुळे विशेष महासभेबाबत निर्णय घेता येत नसल्याचे मनपा सुत्रांकडून समजते.
महानगरपालिका हद्दीत पाण्याची टंचाई भासत असल्याने पाणी टंचाईसाठी उपाययोजना करण्यासाठी व निर्णयासाठी विशेष महासभेचे आयोजन त्वरित करण्यात यावे, अशा सूचना महापौर सीमा सुरेश भोळे यांनी मनपा प्रशासनास केलेल्या आहेत. शहरातील विविध भाग तसेच सुप्रीम कॉलनी भागात पाणीटंचाईने तीव्र स्वरुप धारण केलेले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात लागू झालेली आचारसंहिता पाणी प्रश्नांसाठी राज्यात शिथील करण्यात आली आहे. शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नाने गंभीर स्वरुप धारण केले आहे. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी त्वरित विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना महापौर सिमा सुरेश भोळे यांनी मनपा प्रशासनाला केलेल्या आहेत. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आचारसंहिता शिथीलच्या लेखी सूचनाच प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे विशेष महासभेचे आयोजन करता येत नसल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली. लेखी सूचनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपा प्रशासन पाठपुरावा करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.