भुसावळ दि . 5 –
येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वे परिसर सुशोभीकरण करण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवजयंतीच्या (तिथीप्रमाणे ) आदल्या दिवशी दिनांक 23 मार्च रोजी बसवला . मात्र याकरिता संबंधितांनी पोलीस ठाण्यात वा प्रशासनास कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना वा पूर्वकल्पना दिली नाही . लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाल्याने संबंधितांनी आचारसंहितेचा भंग केल्याने त्यांना नोटिसी 25 मार्च रोजी बजावण्यात आल्या आहेत .
यामध्ये पुतळा समिती अध्यक्ष लक्ष्मणराव हिंगवे , समिती उपाध्यक्ष आमदार संजय सावकारे, भुसावळ रेल्वेचे विभागीय प्रबंधक आर के यादव , नगरसेवक मुकेश गुंजाळ , कोषाध्यक्ष निर्मल कोठारी ,सदस्य राजेंद्र आवटे , रवींद्र लेकुरवाळे , रितेश जैन , सचिव सुमकीत सुराणा ,यांचा समावेश आहे .सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ श्रीकुमार चिंचकर यांनी बजावलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे की , लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून सुद्धा शिवाजी महाराजाचा नवीन अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला . हा पुतळा बसवितांना रेल्वे प्रशासनाने अथवा पुतळा समितीने पोलीस प्रशासनास कुठल्याही प्रकारची कल्पना दिली नाही तसेच कोणताही पत्रव्यवहार केला नाही याउलट 23 मार्च रोजी तिथी प्रमाणे साज-या होणा-या शिवजयंती मुहूर्तावर आदल्या दिवशी रात्री पुतळा बसविल्याचे बाजारपेठ पोलीस निरीक्षक देविदास पवार यांनी प्रांताधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले .यावरून या सर्व संबंधितांना नोटीस बजावण्यात आली . या बाबत योग्य तो खुलासा 24 तासाचे आत प्रांतांच्या समक्ष सादर करावा . मुदतीती खुलासा सादर न झाल्यास अथवा खुलासा समर्थनीय नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल . असेही नोटिशीत नमुद आहे .दरम्यान नऊ जणांनी खुलासे सादर केले असून सर्व कागदपत्र व हा विषय जिल्हाधिकारी-यांच्या अखत्यारीतला असल्याचे म्हटले आहे .
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.