नवी दिल्ली ;– राज्यात भंडारा-गोंदिया आणि पालघर पोटनिवडणुकांसह आगामी विधानसभा-लोकसभेच्या निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढवणार आहे. दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
पटेल म्हणाले, नाना पटोले हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, येत्या काळात आम्ही सोबत काम करु. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. याबाबत येत्या ९ मे रोजी उमेदवाराची घोषणा करण्यात येईल.