पाचोरा (प्रतिनिधी) : आखिल भारतीय मिना समाज महासभा यासंघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंह घुसिंगा यांच्या आदेशानुसार कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गाळण बु येथील विजयसिंह परदेशी (कायठे) यांची अखिल भारतीय मिना समाज महासभा संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष पदी विजयसिंह परदेशी (कायठे) बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
आखिल भारतीय मिना समाज महासभा संघटनेचे महाराष्ट्र संघठन मजबूत करण्यासाठी विजयसिंग परदेशी यांच्या आनुभव व मार्गदर्शन सर्व जिल्ह्यातील गावा गावात शाखा सुरू करणार आहोत अशी माहिती राज्य उपाध्यक्ष पदी विजयसिंह परदेशी यांनी दिली. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तांवन, मोहरसिंग सलावद ,डाॅ. किरोडी लाल मिनाजी, प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंग घुसिंगा, युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश विठ्ठलसिंग काकरवाल, महेंद्रसिंग बालोद, जळगाव जिल्हा सचिव सुभाष डोभाल, जळगाव जिल्हा अध्यक्ष रमेश जोनवाल आदींनी निवडीबद्दल अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला. परदेशी यांच्या निवडीबद्दल सर्वञ समाज बांधव यांनी अभिनंदन केले आहे.