आखतवाडे येथे बोंड अळी वर मार्गदर्शन

0

आखतवाडे ता. पाचोरा :– येथे राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्मा योजनेअंतर्गत शेत्रीय किसान गप्पा गोष्टी या कार्यक्रमाचे आयोजन दि. १५ रोजी करण्यात आले होते. पाल(रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ हेमंत बाहेती यांनी कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी व मका पिकावरील लष्करी अळींची ओळख प्रादुर्भाव, नियंत्रण व प्रतीबंधात्मक उपाययोजना यावर सखोल मार्गदर्शन केले तर प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी दिपक ठाकुर यांनी खरीप हंगामाची पूर्व तयारी यावर मार्गदर्शन करुन शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

जितेंद्र राजपूत यांनी प्रोजेक्टर वरून बोंड अळी विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळ अधिकारी एस. व्ही. जाधव, कृषी पर्यवेक्षक व्ही. एस. पाटील, सुनील साळवे, सचिन भैरव, प्रदिप मराठे, शेतकरी धनशिंग राजपूत, राजेंद्र राजपूत, संजय गढरी, गोविदशिंग परदेशी, महादू गढरी, चैनशिंग राजपूत, रविंद्र पाटील, तुकाराम पाटील, प्रमोद पाटील, माधव राजपूत, नारायण गढरी, सुधाकर गढरी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.