भातखंडे प्रतिनिधी : येथून जवळच असलेल्या तळई येथील रहिवासी हल्ली मुक्काम जळगाव येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त दत्तात्रेय दाजीबा वाघ साहेब यांच्या मुलाचे नुकतेच लग्न समारंभ पार पडला तदनंतर त्यांचे स्वर्गीय वडील दाजीबा श्रीपत वाघ व स्वर्गवासी आई सौभाग्यवती गोजर बाई दाजीबा वाघ यांचे स्मरणार्थ घरासमोरील महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागेत लोकांना बसण्यासाठी दोन बाक व तरुणांना व वाचकांना खास सोय व्हावी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी स्वखर्चाने वाचनालय सुरू केले त्या वाचनालयाच्या उद्घाटनासाठी त्यांच्या भागाच्या नगरसेविका सौभाग्यवती उज्वलाताई किरण बेंडाळे त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तळई सह त्यांच्या रहिवास असलेल्या परिसरातील नागरिकांना त्यांचा सार्थ अभिमान वाटत आहे आणि त्यांनी बाक व वाचनालय सुरू करून परिसरातील नागरिकांचा आनंद द्विगुणीत केला आहे.