आईन्स्टाईन शेजारी स्टीफन हॉकिंग्स घेणार  चिरनिद्रा

0
नवी दिल्ली ;-
प्रसिद्ध ब्रिटीश संशोधक, शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्स यांच्यावर ३१ मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात येत असून त्याचे दफन वेस्टमिन्स्टर अॅबे येथे करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हॉकिंग्स याच्यावर केम्ब्रिजच्या ग्रेट सेंट मेरीज युनिव्हर्सिटी चर्च मध्ये पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यानंतर श्रद्धांजली सभा होणार आहे.
हॉकिंग्स यांचे १४ मार्च रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले असून त्यांनी ब्रह्मांड आणि ब्लॅक होल संदर्भात मोलाचे संशोधन केले आहे. गेली अनेक वर्षे ते आजारी होते. मेंदूशिवाय त्याच्या शरीराचा कोणताच भाग कार्यरत नव्हता तरीही त्यांच्या संशोधनात खंड पडला नव्हता. वेस्टमिन्स्टर येथे त्यांचे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन आणि डार्विन याच्याशेजारी दफन केले जाणार आहे. विज्ञान आणि धर्म मिळून जीवन आणि ब्रह्मांड याची गुपिते शोधण्याची क्रिया यामुळे सुरु होईल असे मनोगत वेस्टमिन्स्टर चे डीन जॉन हॉल यांनी व्यक्त केले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.