लोहारा ता.पाचोरा (प्रतिनिधी) : घाटी रुग्णालयात ३५ वर्षे नोकरीची कर्तव्य बजावून रुग्णालयात कुटुंबीयांसोबत नातेवाइकांच्या होत असलेल्या हालअपेष्टा याचा अनुभव डोळ्यासमोर ठेवून निवृत्त परिचारिका सौ विजया डोंगरदिवे यांनी आपल्या आईचा प्रथम पुण्यस्मरण वायफळ खर्चाला फाटा देऊन गरजू रुग्णांच्या मदतीसाठी साजरा केला याला कारण होते माणुसकी ग्रुपचे पावन विचार सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवभावी संस्था औरंगाबाद यांच्या सहकार्याने माणुसकी गृपच्या सदस्या सौ.विजया प्रदिप डोंगरदिवे यांच्या तर्फे घाटी रुग्णालयात त्यांच्या आई स्व.सोनाबाई महादु निरखाते यांच्या प्रथम पुण्यस्मरनार्थ याचे दुःख होते पण विचाराला विशाल महासागर ठेवून माणुसकी नावासाठी कार्य करणारे समूहातील छोटुराम ठुबे, गजानन क्षिरसागर, संदिप ठुबे,यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्ण सेवेसाठी सकाळपासून ४ गरजवंत रुग्णांना रक्ताच्या बँग देण्यात आल्या व रुग्णालयातील पेशंटला ५ मोठे कार्टुन भिस्किटाचे वाटप व गरजवंत पेशंट ला मेडिकल साहित्य देण्यात आले हा कार्यक्रम शासकिय वैद्यकीय रुग्णालयातील मेडिशिन बील्डिग मध्ये वार्ड क्र १.२.३.४.५.६.८.९.घाटि मध्ये घेण्यात आला. कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले ते समाजसेवक सुमित पंडित,छोटुराम ठुबे,संदिप ठुबे,गजानन क्षिरसागर, संदिप ठुबे,प्रदिप डोगरदिवे,आयुष डोगरदिवे,विष्णू बोर्डे, संदेश चंदनशीव,तुषार डोगरदिवे,सौ विजया डोगरदिवे, सुमन डोगरदिवे,पुजा पंडित, शशीकला चंदनशिवे,आदिंनी सहकार्य केले.
देणाऱ्याने देत जावे हे घेणाऱ्याने घेत जावे हे घेता घेता एक दिवस घेणार्याचे हात घ्यावे. या उक्तीचा सार्थ अभिमान ठरणारा हा माणुसकी ग्रुपमधील छोटेखानी गरजू रुग्णांसाठी कार्यक्रम झाला अशा पद्धतीने जर पुण्यस्मरण,वाढदिवस साजरे झाले तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगताना व माणुसकीचे कार्यकरताना समाधान झाल्यासारखे वाटते.
सुमित पंडित – माणुसकी ग्रुपचे संस्थापक