भुसावळ :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात आज दि.२२ जुन रोजी भारत स्काउट्स –गाईड्सच्या राष्ट्रीय स्तरिय योगा शिबिराचा समारोप झाला .या प्रसंगी कार्यक्रमास मुंबई येथून स्काउट्चे राज्य मुख्य आयुक्त आणि मध्य रेलवे चे प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी एन.स्वामीनाथन उपस्थित होते .
या शिबिराच्या समारोप प्रसंगी एन. स्वामीनाथन यांनी संबोधित करताना त्यांनी उपस्थित स्काउट्स –गाईड्सला केवळ विश्व योगा दिवशी करुन चालणार नाही तर आपल्या रोजच्या दिनचर्चेत किमान ३० मिनिटे तरी योगा प्राणायम करुन आपले आरोग्य सुद्रुढ़ ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले .यावेळी त्यांनी जुन्या आठवणीना उजाळा देत मागील ३६ वर्षापासून मी रेलवेच्या सेवेत असून भारत स्काउट्स –गाईड्स संगठनशी जोडून आहे .राष्ट्र निर्मितेत आणि युवा पीढ़ी घड़वण्यात भारत स्काउट्स –गाईड्स संगठनचा फार मोठा योगदान असल्याचे त्यानी सांगितले .या संगठनशी जोडून राहून सहकार ,सदभावना ,नीतिमत्ता या मुल्याचा विकास होतो आणि राष्ट्र निर्मिती साठी पोशख वातावरण निर्मिती होते.
प्रमुख अतिथि एन.स्वामीनाथन यांच्या हस्ते भारतातून आलेल्या विविध राज्यातील स्काउट्स –गाईड्स यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. शिबिर यशस्वीतेसाठी क्षेत्रीय संगठन आयुक्त अनेश कुमार ,डॉ हरी नारायण ,मधुमाला कौशल , मनोज नायर , विद्या वास ,रवि कनोजिया , संध्या पिल्ले यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी भुसावळ विभागाचे जिल्हा आयुक्त आणि वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे उपस्थित होते.हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडल्याबदल सर्व रेलवे विभाग आणि सर्व कर्मचारी या सर्वाचे आभार मानण्यात आले.