आंतरजातीय प्रेमविवाह करणा-या दाम्पत्यांस मारहाण ; 12 जणां विरुद्ध गुन्हा

0

भुसावळ :- मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचास राग आल्याने गरोदर मुलीस व तिच्या पतीला बेदम मारहाण करणा-या  माहेरच्या तब्बल 12 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची घटना रविवारी येथे घडली.

भिरुड  हॉस्पीटलमागील कृष्णा नगरातील रहिवासी  सौ. सोना नितीन कांडेलकर या युवतीने घरच्यांच्या मनाविरूध्द आंतरजातीय प्रेमविवाह केला यामुळे तिच्या माहेरच्या मंडळीला भयानक राग आला व त्यांनी या रागात रविवार रोजी दुपारी सोना आणि तिचा पती नितीन यांना बेदम मारहाण केली. यात गर्भवती असलेल्या  सोनालाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सोना नितीन कांडलकर हिने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ  पोलीस स्थानकात नवलसिंग मज्जूसिंग भाडिया (रा. हरदा, मध्यप्रदेश); बबलूसिंग दीपसिंग बावरा, दीपसिंग तेजसिंग बावरा, प्रदीपसिंग दरबारसिंग बाटीया, मंगलसिंग चंदासिंग छाबडा, अवतारसिंग दर्शनसिंग बाटीया, चंदनकौर मंगलसिंग छाबडा, छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजीतसिंग मंगलसिंग बावरा, जर्नेलसिंग गुमानसिंग बावरा, प्रधानसिंग चरणसिंग बावरा, बलजीतसिंग तेजसिंग बावरा (सर्व रा. कृष्णानगर, भिरूड हॉस्पीटलमागे भुसावळ )  या सर्व संशयीतांविरूध्द भाग ५, गुरन २८६, भादंवि कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि सारिका खैरनार या करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.