भङगाव – तालुक्यातील आंचळगाव, तळबण तांङा, वसंतवाङी, धोञे या गावांमध्ये गेल्या मार्च महीन्यापासुन तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.टँकर सुरु करण्याच्या मागणीसाठी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी भोसले यांचेसह नागरीकांनी दि. 17 रोजी आंचळगाव येथील महादेवाच्या मंदीरासमोर सकाळी 9.30 वाजता आमरण उपोषणास सुरुवात केली होती. अखेर प्रशासनाने पाण्याचे 4 टँकर सुरु करण्यास तात्काळ मंजुरीचे आदेश दिले. त्यामुळे माजी उप सभापती संभाजी भोसले यांना पारोळा एरंङोलचे आमदार ङॉ. सतीष पाटील यांचे हस्ते शरबत देउन उपोषण सोङण्यात आले.
या उपोषणाची सांगता दुपारी 3.15 वाजता करण्यात आली.यावेळी भङगावचे निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर, सहाय्यक गटविकास अधिकारी टी पी मोरे, तलाठी, ग्रामसेवक व नागरीकांची मोठी उपस्थिती होती. जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि,गेल्या मार्च पासुन आंचळगाव, वसंतवाङी, तळबण तांङा, धोञे या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई आहे. आतापर्यंत नागरीकांनी आपल्यापरीने पाण्याची तजबीज केली.परंतु आता अवघङ परीस्थिती झाली आहे.आबालवृद्ध पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.तरी दि. 16 पर्यंत पाण्यासाठी टँकर सुरु करावे. अन्यथा दि 17 रोजी आंचळगाव येथे महादेव मंदीराजवळ आपण नागरीकांसह आमरण उपोषणास बसु . या आशयाचा ईशारा भङगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी निवेदनादनाच्या प्रति जिल्हाधिकारी, पंचायत समिती गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आदिंना दिल्या होत्या.
माञ प्रशासनाने दखल न घेतल्याने पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांनी नागरीकांसह आमरण उपोषणास बसण्याचा मार्ग अवलंबविला. त्यांचे सोबत काशीनाथ पाटील,नाना पाटील, भगवान पाटील रा . आमङदे,गोटा भाऊसाहेब, धोंङा बापुजी,रिंकु पाटील,प्रशांत पाटील आंचळगावसह आदि नागरीक उपोषणात सहभागी होते. पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी तात्काळ पाण्याचे 4 टँकरांना मंजुरीचे आदेश दिले. आंचळगाव या गावासाठी 2 पाण्याचे टँकर व वसंतवाङी, तळबण तांङा या दोन गावांसाठी पाण्याचे 2 टँकर मंजुरीचे आदेश देण्यात आले आहेत. आंचळगाव, वसंतवाङी,तळबण तांङा या गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरु होत असल्याने नागरीकातुन समाधान व्यक्त होत आहे.