Wednesday, February 1, 2023

अ. र.भा.गरुड महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

- Advertisement -

शेंदुर्णी : आज  मंगळवार रोजी महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमीचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा.वर्षा निकम यांनी राष्ट्रमाता जिजाऊंना ओवी गाऊन मानवंदना दिली तसेच मनोगत व्यक्त केले.यानंतर प्रा.निरुपमा वानखेडे यांनी स्वरचित काव्यातून राष्ट्रमाता जिजाऊंच्या कार्याची व त्यागाची आठवण करून दिली. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.वासुदेव आर.पाटील यांनी प्रतिपादन केले की स्वामी विवेकानंद  व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार अखिल विश्वासाठी प्रेरणादायी आहेत. तसेच तरुणांनी यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्यात प्रगती साधावी असे विवेचन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया पाटील व कार्यक्रमाचे आभार प्रा.रिना पाटील यांनी केले.या प्रसंगी ज्युनियर विंग व सिनियर विंग चे रासेयो कार्यक्रम अधिकारी, विद्यार्थी विकास विभाग अधिकारी, रासेयो स्वयंसेवक, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.निरुपमा वानखेडे, प्रा.वर्षा निकम प्रा.रिना पाटील,प्रा.छाया पाटील व विद्यार्थ्यांनि परिश्रम घेतले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे