जळगाव | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची विभागीय शाखा वाढविण्याची जबाबदारी मुक्ताईनगर येथे मर्ज करण्यात आली असून जळगाव शाखा स्थापनेपासून अकार्यक्षम असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेचे सुनिल ढगे, सतिष दोडके यांनी पत्रपरिषदेला दिली.
हॉटेल रॉयल पलेसमध्ये झालेल्या या पत्रपरिषदेत अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, अॅड.संजय राणे,दै.पथयात्रीचे चंद्रशेखर पाटील, योगेश शुक्ल उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची विभागीय शाखा वाढविण्याची जबाबदारी मुक्ताईनगर येथे मर्ज करण्यात आली असून जळगाव शाखा श्रीपाद जोशी स्थापनेपासून अकार्यक्षम असल्याने अ.भा. नाट्य परिषदेची विभागीय शाखा वाढविण्याची जबाबदारी मुक्तईनगराला मर्ज करण्यात आली असून अध्यक्षाची जबाबदारी रोहिणीताई खडसे- खेवलकर यांचेकडे देण्यात आली असून यापुढील कामकाज त्या बघणार आहेत सध्याचे परिषदेचे अधिकृत 148 सभासद असून मागील कामांची सर्व शहानिषा करूनच नवीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली आहे.उपाध्यक्ष म्हणून अॅड. संजय राणे,शंभू पाटील, प्रमुखकार्यवाहक योगेश शुक्ल, खजिनदार डॉ. शमा सुबोध सराफ
कार्यकारिणी सदस्य:- अनिल कोष्टी(भुसावळ),हेमंत पाटील, अॅड. प्रविण पांडे, शरद पांडे, दिपीका चांदोरकर प्रमुख मार्गदर्शक ना. धो. महानोर, अशोक जैन, चारूदत्त गोखले अशी एकूण कार्यकारिणी राहणार आहे. यावेळी राहिणीताई यांनी मागचे सारे विसरून आता नव्याने परिषदेचे कामकाज राहिल त्यासाठी कलावंतांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आपले विचार व्यक्त केले.