अमळनेर- येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कुल येथे प्रि प्रायमरी तसेच इ 1ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या अध्यक्षा अॅड ललिता पाटील,सचिव प्रा श्याम पाटील,संचालक पराग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन लाईव्ह क्लासेस ची सुरुवात करण्यात आलेली असुन विद्यार्थी व पालकांचा ह्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे लाॅकडाऊन काळातही अध्ययन अध्यापन कार्य सुरळीत असल्याने विद्यार्थी,पालक व शिक्षकांमधे उत्साहाचे वातावरण दिसून येते आहे.
मार्च महिन्याच्या लाॅकडाऊन नंतरही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी स्कुल च्या वतीने एप्रिल व मे महिन्यात देखील व्हाॅट्स अॅप ग्रुपमध्ये ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून निरंतर शिक्षण देण्याचे काम सुरु ठेवले होते.यानंतर जुन महिन्यात स्वतः शाळेचे शिक्षक ह्या नवीन वर्षाचा अभ्यासक्रम ऑनलाईन लाईव्ह(व्हिडीओ कॉन्फरन्स) क्लासेस च्या माध्यमातून शिकवत असुन यामुळे विद्यार्थ्यांची शाळा बंद असुनही शिक्षण सुरु आहे.संस्थेच्या हया उपक्रमाने विद्यार्थी व पालकांमधे उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असुन सर्वांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केलेले आहे.यासाठी प्राचार्य विकास चौधरी,प्रशासन अधिकारी अमोल माळी व सर्व शिक्षक वृंद परीश्रम घेत आहेत.