अादित्य ठाकरे १८ जुलैला जिल्ह्यात; उद्या होणार बैठक

0

जळगाव :- युवासेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे हे येत्या १८ जुलै राेजी जिल्हा दाैऱ्यावर येणार अाहेत. या कार्यक्रमाच्या नियाेजनासाठी १४ जुलै रोजी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी व सर्व अंगीकृत संघटनांची १२ वाजता केमिस्ट भवन येथे तातडीची बैठक आयोजित केली आहे.

बैठकीला राज्यमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, विलास पारकर मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून युवा सेना विस्तारक कुणाल दराडे, आमदार किशोर पाटील, चंद्रकांत सोनवणे, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, महिला जिल्हा प्रमुख महानंदा पाटील उपस्थित राहणार आहेत. बैठकीत युवासेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे यांच्या दाैऱ्याच्या नियाेजनासह विविध विषयावर चर्चा करण्यात येणार अाहे.
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला आघाडी नगरसेवक युवा सेना पदाधिकारी व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे महानगर प्रमुख शरद तायडे यांनी कळवले अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.