अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी पांडुरंग बोराडे तर सचिवपदी योगेश साबळे

0

जळगाव :-पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सव समिती अध्यक्षपदी पांडुरंग बोराडे तर सचिवपदी योगेश साबळे यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 294 जयंती उत्सव दि ३१ मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी नऊ वाजता धनगर समाजातील ज्येष्ठ नागरिक भगवान साबळे यांच्या हस्ते सपत्निक  अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.

धनगर समाजाची बैठक नुकतीच अहिल्यादेवी नगर येथील समाज भवनामध्ये त्र्यंबक अगोणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अध्यक्षपदी पांडुरंग बोराडे ,उपाध्यक्ष रवींद्र अगोणे ,सचिव योगेश साबळे यांची निवड करण्यात आली या बैठकीस धनगर समाज मंडळाचे अध्यक्ष पोपट अगोणे, सचिव रमेश जानराव सदस्य साहेबराव अगोणे, बापूराव सोनवणे, देविदास अगोणे  साईनाथ देवरे, प्रमोद अगोणे यांच्यासह इतर सदस्य व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सव समितीच्या माध्यमातून

दोन जून रोजी सकाळी नऊ वाजता शहरांमध्ये मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे त्याच प्रमाणे सायंकाळी पाच  वाजता मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणुक काढण्यात येणार आहे. या शिवाय  इतर उपक्रम घेण्यात येणार आहे. तरी वरील सर्व कार्यक्रमांना समाज बांधवांसह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन धनगर समाज उन्नती मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.