पाचोरा (प्रतिनिधी) –
सेवा निवृत्त झाल्यावर जेवणावळी देणे बडेजाव कार्यक्रम घेणे हे क्रमप्राप्त असते पंरतु याला अपवाद ठरले.
सहाय्यक फौजदार भास्कर पाटील पाचोरा तालुक्यातील कुंरगी येथील मुळरहीवाशी असलेले सहाय्यक फौजदार भास्कर पाटील सेवानिव्रुत्त झालेने त्यांचा कुरंगी येथील सरपंच व ग्रामवासियांकडुन जाहीर सत्कार नुकताच करण्यात आला.
भास्कर पाटील यांच्या कडून सेवानिव्रुत्तिचा अनोखा स्तुत्य उपक्रम करण्यात आला यात, जिल्हा परिषद शाळेतील व माध्य.विद्यालयातील १३० विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,शालेय साहित्य वाटप.करण्यात आले. कुंरगी गावातील ४५गरिब गरजु महिला व विधवांना साडींचे व १५ गरीब गरजु पुरुषांना कपडे मोफत वाटप करण्यात आला.
माध्यमिक .विद्यालयातील हुशार प्रथम तिन विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणून उपविभागिय पोलीस अधिकारी केशवराव पातोंड, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे तहसीलदार बी. ए. कापसे, कॉग्रेस जिल्हा आरोग्य सेवा सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, सरपंच श्री. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी केशवराव पातोंड यांनी पोलीस विभागात कार्य करतांना अनेक संघर्षातून जावे लागते त्यातच सेवानिवृत्ति नंतर समाजातील गरजांचा विचार करणारे थोडेच असतात. भास्कर पाटील यांनी जो उपक्रम राबविला त्यांचे कौतुक जेवढे करावे तेवढे थोडेच. यापुढेही असेच कार्य सूरु ठेवावे या सदिच्छा दिल्या. सचिन सोमवंशी यांनी यापुढे समाजकारणात जास्तीत जास्त वेळ द्यावा त्याचसोबत गावातील गरजु उपेक्षित घटकांचा आधारस्तंभ व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या वेळी भास्कर पाटील यांनी सत्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाला बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थिति दिली. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा परीसरात आहे.