अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्राला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला  अश्लील चित्रपट प्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्राच्या या प्रकरणी अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज कुंद्रासोबत त्याचा सहकारी रायन थॉर्पच्याही न्यायालयीन कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. तर राज कुंद्राचे वकील सुभाष जाधव यांनी राज कुंद्राच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने २० जुलैला बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली आहे. पोर्नोग्राफीच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राविरेधात पोलिसांच्या हाती अनेक पुरावे लागले आहेत. राज कुंद्राच्या अटकेपासूनच रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यानंतर राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये पॉर्न फिल्म प्रकरणामध्ये मढ येथील एका बंगल्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली होती. त्यानंतर राज कुंद्राने तातडीने आपल्याकडील सर्व डेटा डिलीट केला होता आणि तसेच त्यांनी आपला मोबाइल फोनही बदलला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राज कुंद्राला २० जुलैला अटक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. अटक झाल्यानंतर राज कुद्राला २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस चौकशीत राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागले. दरम्यान २३ तारखेच्या सुनावणीत २७ जुलै पर्यंत पोलीस पोलिस कोठडी वाढवण्यात आली होती.

या प्रकरणी राज कुंद्र आणि शिल्पा शेट्टीच्या बँका खात्यांची देखील मुंबई गुन्हे शाखेने चौकशी केली असता खळबळजनक माहिती समोर आली आहे. राज कुंद्राच्या बँक खात्यांमधून कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याचे उघड झाले. तर राज कुंद्राची कानपूरमधील दोन बँक खाती सील करण्यात आली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here