स्मशानभूमीत पाणीटंचाई पथदिव्यांअभावी काळोख
जळगाव, दि. 19 –
वाढती लोकसंख्या… अचानक येणारे मृत्यू अन् अंत्यसंस्काराच्या वेळी होणारी हालअपेष्टा शेवटच्या प्रवासातही पाठ सोडण्याचे नाव घेत नाही. जळगावातील स्मशानूमींची अवस्था तर एखाद्या खेड्यालाही लाजविल असे आहे. येथील स्मशानूमीत माणसांचे तर सोडाच निर्जीव असलेल्या अश्माला (पाण्याचे मडके फोडण्यासाठी वापरण्यात येणार दगड, त्यालाच जीव असे म्हणतात) देखील वाट पाहवी लागत आहे.
शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणार्या सुविधांची येथे अतिशय वाईट परिस्थिती असताना त्यात पाणी टंचाइॅची देखील भरीस भर आहे. पिंप्राळा परिसरातील स्मशानूमीत प्रेतासाठी स्मशानूमी देखील नाही, येथे उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मृतात्म्याला पाणी देण्याच्या वेळी येथे पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना सोबत पाण्याची व्यवस्था करावी लागत असते. उन्हाच्या वेळी येथे कुठल्याही प्रकारचे शेड नसल्याने नागरिकांना दु:खासह उन्हाचे देखील चटके सहन करावे लागत आहेत. अंत्यसंस्काराप्रसंगी पाण्याची नितांत आवश्यता असते. केस देणे, आंघोळ करणे, मृतात्म्याला पाणी देण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते मात्र महानगरपालिकेकडून उपययोजनांची बोंब असल्याने नागरिकांना पाण्याची व्यवस्था करण्याचा कटू प्रसंग येत आहे.