चोपडरा | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा-चोपडाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक, कवी अशोक नीलकंठ सोनवणे (चोपडा) यांना नुकताच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा ‘उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार-२०१९’ प्रथम पुरस्कार त्यांच्या ‘खिडकी बाहेरचे जग’ या बालसाहित्यकृतीला जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे वितरण दि.२१ एप्रिल २०१९ रोजी जेष्ठ मराठी साहित्यिका अरुणा ढेरे (माजी संमेलनाध्यक्षा- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे माजी संमेलनाध्यक्ष डॉ.सदानंद मोरे (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथे केले जाणार आहे.
अशोक सोनवणे यांची ही बारावी साहित्यकृती असून त्यांना यापूर्वी राज्य शासनाचा बालवाङमय निर्मितीचा व विविध अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.