अवैध सट्टा- मटका जोमात, प्रशासन कोमात

0

पाचोरा | प्रतिनिधी

पाचोरा शहरासह तालुक्यात सट्टा – मटक्याचा अवैध व्यवसाय सद्यस्थितीत जोरात सुरू असुनयाप्रकारामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
तालुक्यात सट्टा – मटका सोबतच जुगार अड्डे जोमात सुरू असुन शहरासह तालुक्यात जागोजागी सट्टा बीटींग घेण्याऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. या सट्टा – मटका पिढ्यांवर दिवसभर यात्रेचे स्वरुप येवुन यातुन अनेकदा किरकोळ वाद ही उद्धभवतात. शहरातील बहुतांशी जागेवर जुगार अड्ड्यांचे क्लबही थाटलेले आहे. लालसेपोटी गोर – गरिब नागरिक मोल – मजुरी करुन या लालसेला बळी पडुन व्यसनाधीन होत आहेत. याचा विपरीत परिणाम म्हणुन बहुतांशी नागरिक हे संसारोपयोगी वस्तु विकुन त्याचा कौटुंबिक वादात रुपांतर होवुन संसार उद्धवस्त होतांना दिसत आहे. या अवैध सट्टा – मटका लावण्यात प्रौढांसोबतच अल्पवयीन मुले, तरुणांही आपल्या विळख्यात अडकविले आहे. या संपूर्ण प्रकाराकडे मात्र संबंधीत प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असुन जणु काही कुंभकर्णी झोपेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
ओपन में अटका, क्लोज में फटका
     सट्टा – मटका बिटींगमध्ये ओपन व क्लोज याप्रमाणे आकडे लावले जातात. जर ओपनमध्ये आकडा लागला तर लालसेपोटी आलेले पैसे परत क्लोज आकड्यात लावले जातात. परंतु विपरीत परिणाम म्हणुन क्लोजमध्ये आकडा न लागल्याने मिळालेल्या रक्कमेलाही अनेक नागरिक गमावुन बसतात. तसेच व्यसनाधीन हे अघोरी विद्या,  बुवाबाजीकडे सरसावुन कमी अवधीत जास्त पैसे मिळविण्याकडे वळल्याने सदर सट्टा – मटका बंद करण्यात यावा. अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडुन जोर धरु लागली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.