अवैध शिधापत्रिका तपासणी शोध मोहिम; शिधापत्रिकांची तपासणी सुरू

0

बुलडाणा : अपात्र शिधापत्रिका शोधून रद्द करण्याकरीता खास शोध मोहिम राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत बीपीएल, अंत्योदय, अन्नपुर्णा, केशरी, शुभ्र व आस्थापना कार्ड या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी शोध मोहिम 30 एप्रिल 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे संबंधीत रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांकडून माहिती भरून दिलेले अर्ज स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह तलाठी अथवा संबंधीत शासकीय कर्मचाऱ्यांनी पोच द्यावी. शिधापत्रिकाधारकांनी राहत असलेल्या भागातील रहिवासी पुरावा द्यावा, त्यामध्ये भाडेपावती, निवास स्थानाच्या मालकीबद्दलचा पुरवा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबुक, वीजेचे देयक, दूरध्वनी देयक, चालक परवाना, अन्य कार्यालयीन ओळखपत्र, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आदीपैकी एका पुराव्याचा समावेश असावा.

दिलेला पुरावा हा एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. शिधापत्रिकेची तपासणी करताना यंत्रणेने एका कुटूंबात व एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.  अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबधित तहसिलदार अथवा तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. एकाच पत्त्यावर दोन शिधापत्रिका विभक्त कुटूंबामध्ये देताना, दोन्हीही शिधापत्रिका बीपीएल अथवा अंत्योदय अन्न योजनेच्या असणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती,  स्थलांतरीत व्यक्ती, मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. तरी लाभार्थ्यांनी अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेला प्रतिसाद देवून आपली शिधापत्रिकेची खात्री करून घ्यावी.  या मोहिमेतंर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्याप्रमाणात रास्तभाव दुकानांकडील कोटा कमी करण्यात यावा, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.