जळगाव | प्रतिनिधी
गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूचोरी करुन वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर तालुका पोलिसांनी बुधवारी वाघनगर परिसरात पकडले.
गिरणा पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कर्मचारी जितेंद्र पाटील यांनी वाघनगर परिसरात गस्त केली. या वेळी तेथुन एक ट्रॅक्टर व एक डंपर वाळू वाहतूक करताना मिळून आले. दरम्यान, डंपरचालकाकडे पावती होती; परंतु ती वैध आहे की अवैध या बाबत खात्री करण्यासाठी दोन्ही वाहनांसह पावती तहसीलदार यांच्याकडे पडताळणी व कारवाईसाठी पाठविण्यात आल्या आहे. दरम्यान, शहरात बिनधास्तपणे वाळू वाहतूक सुरू अाहे. अनेक मुख्य चाैकातून वाहतूक पाेलिसांच्या समाेरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर, डंपर ये-जा करतात तरी देखील पाेलिस त्याकडे कानाडाेळा करीत असल्याने अवैध वाळू वाहतूक वाढली अाहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.