अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0

 जळगाव  | प्रतिनिधी

महामार्गावर मानराज पार्कजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थेट पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पकडले. शनिवारी सकाळी सात वाजता ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधीक्षक डॉ. मुंडे हे महामार्गावरून जात असताना त्यांना वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच-१९, पी-२८५०, ट्रॉली- एमएच-१९, एएन- ८७०२) दिसून आले. या वेळी डॉ. मुंडे यांनी चालक सागर उल्हास कोळी (रा. वाल्मीकनगर) याला अडवून वाळू वाहतुकीचा परवाना मागितला. दरम्यान, वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने डॉ. मुंडे यांनी आरटीपीसी भूषण पाटील यांना सांगून नियंत्रण कक्षात माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांना माहिती मिळताच उमेश वार व संतोष पाटील यांनी घटनास्थळी येऊन ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाण्यात नेले. उमेश पवार यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचाल‍क सागर कोळी व मालक जगदीश सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पाेलिस अधिक्षकांनी स्वत: हे वाळूचे ट्रॅक्टर पकडल्याने तस्करांचे धाबे दणाणले अाहे.

Leave A Reply

Your email address will not be published.