अवैध वाळू वाहतुकीवर आता ग्रामदक्षता समितीची नजर

0

भडगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यात गौणखनिज अवैध उत्खनन साठा व वाहतुकीच्या तक्रारी तसेच अवैध गौणखनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे कामी तालुक्यातील सर्व गावात ग्राम दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या बाबत तहसिलदार सागर ढवळे यांनी दि.4 रोजी आदेश काढले आहे.

या आदेशात नमूद केले आहे की, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती चे सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील, कोतवाल, तलाठी यांची ग्राम दक्षता समिती ची नेमणूक करण्यात आली आहे. या समितीने गावात दर पंधरा दिवसांनी एक बैठक घेऊन अवैध वाळू उत्खनन व साठा होत असल्यास त्याला आळा घालण्यासाठी बैठकीत सविस्तर सांगावे. तसेच त्या शिफारशी तहसिलदार भडगाव, जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कडे सादर कराव्या.

व अवैध गौण खनिज साठा व वाहतूक होत असेल तर यावर नियंत्रण ठेवावे. ग्राम दक्षता समितीची बैठक घेऊन त्याचे इतिवृत्त प्रांताधिकारी पाचोरा, तहसिलदार भडगाव यांच्या कार्यालयात दि.15 मार्च पर्यंत सादर करावे. पहिल्या बैठकीत गौण खनिज बाबत संपूर्ण माहिती, तपशील तसेच फौजदार प्रक्रिया सहिता 1973, मधील तरतूद, भारतीय दंड संहिता 1860, महाराष्ट्र जमीन महसूल सहीता 1966 कलम 48 (सुधारित)सह खनिजे विकास विनिमय अधिनियम 1957 व त्याखालील नियमांतर्गत कारवाही ची माहिती ग्राम दक्षता समिती ने द्यावी. असे आदेश तहसिलदार सागर ढवळे यांनी काढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.