अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणारे ७ ट्रॅक्टर ट्रॉली सह पकडण्यात आले असून पोना दीपक माळी यांच्या फिर्यादीवरून संशयित चालक व मालक यांच्या विरुद्ध भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी एकूण ५० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
हिंगोने शिवारातील बोरी नदीच्या पात्रातून अवैध गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे यांना प्राप्त झाल्याने त्यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने येथील नवनियुक्त पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नियोजनाखाली पो.हे.कॉ.दीपक वसावे,संजय पाटील, दीपक माळी, रवी पाटील,सुनील पाटील यांच्या पोलीस पथकाने अवैध रेती वाहतुकदारांवर कारवाई केली.आठवड्यात केलेली सलग दुसरी मोठी कारवाई आहे,मागील आठवड्यात ७ डंपर व १ जेसिबी पोलीस विभागाने तापी नदीच्या पात्रातून पकडले होते.