अवैध रेतीची वाहतूक करणारी ट्रक जमा

0

भुसावळ | प्रतिनिधी
भुसावळ येथे निवडणूकीच्या पाश्वभुमीवर स्टॅटीक सार्वेलन्स टीमने दि.16 रोजी रात्री वाहण तपासणीत 5 ब्रास रेती भरलेला ट्रक पकडला, ट्रक क्रमांक MH 18 M 4814 या नंबरचा ट्रक रात्रीच्या वेळेस5 ब्रास रेतीची अवैध वाहतूक करत असतांना टीम मधील कर्मचारीनी ट्रक ची तपासणी केली असता त्यात रेती आढळली.टीम ने गाडी तहसील कार्यालयात लावली,
येथील नाहाटा चौफुलीवर महसूल विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी पथक व पोलीस कर्मचारी यांनी नाकाबंदी केल्या दरम्यान वाहनाची चौकशी करतांना एम.एच.१८ एम.४८१४ या ट्रकमधून अवैध रेतीचा वाहतूक केली जात असल्यामुळे व चलका जवळ कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे जिल्ह्यधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी पथकाचे सुदाम नागरे व पो.कॉ.ईश्वर भालेराव, पो.कॉ.अक्षय चव्हाण अशांनी नाहाटा चौफुलीवर कारवाई केली.अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.