अवैधरित्या डब्बरची वाहतुक करणारे दोन ट्रक पकडले

0

खामगाव – अवैधरित्या गौणखनिजाणी वाहतुक करणारे दोन ट्रक येथील तहसिलदारांच्या पथकाने नांदुरा रोडवरील पारखेड शिवारातून ताब्यात घेतले. यावेळी तहसिलदारांनी उपरोक्त दोन्ही ट्रक चालकांना सव्वा पाच लाखांच्या दंडाची नोटीस बजावली आहे.

खामगाव-नांदुरा मार्गावरील पारखेड शिवारात काल दुपारी येथील तहसिल कार्यालयातील पथकाने ट्रक क्रमांक आर जे 13 बीबी 1901 व ट्रक क्रमांक एमएच 28 बीबी 1892 या दोन्ही ट्रकांना  डब्बरची वाहतुक करतांना पथकाने पकडले. यावेळी सदर ट्रकच्या चालकांना गौण खनिज वाहतुकीचा परवाना मागितला असता त्यांचेकडे मिळून आले नाही. त्यामुळे पथकाने दोन ट्रक ताब्यात घेवून तहसिल कार्यालयाला लावले. उपरोक्त दोन्ही ट्रकविरूध्द तहसिलदारांनी 5 लाख 24,800 रूपयांचा दंडाची नोटीस बजावली आहे. अशी माहिती तहसिलदार डॉ. शितल रसाळ यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.