अवघ्या पाचच दिवसांत रेल्वे विभागाने पुलाचे थांबविले काम

0

अवजड क्रेन उभी करण्यास जागा उपलब्ध होत नसल्याने काम लांबणीवर

जळगांव –
येथील मध्य रेल्वे मार्गाच्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे नुतनीकरण कोनशीला कामाचे उद्धाटन झाल्यानंतर पुलाचे वरील थर काढण्याचा कामास सुरूवात करण्यात आली होती. परंतु पुलाचे लोखंडी गडर्स उतरविण्यासाठी रेल्वे हद्दीत काम करत असतांना वापरण्यात येणारी क्रेन उभी करण्यास जागा मिळणार नसल्याने हे काम अवघ्या 5 दिवसांतच रेल्वेने थांबविेले, पर्यायाने गेल्या सात आठ दिवसांपासून पुलाचे काम बंद अवस्थेत असल्याने पुलाचे काम लांबणीवर पडणार आहे असे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे.
मध्य रेल्वेच्या जळगांव जंक्शन स्थानकानजीक जुन्या आग्रा महामार्गावरील जिल्हा परीषद भवनाशेजारील रेल्वे उड्डाण पुलाची कालमर्यादा संपुष्टात आली होती. या पुलाच्या नुतनीकरण कामाचे भुमीपुजन कार्यक्रम 15 फेब्रुवारी रोजी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.
शहर परीसर ते रेल्वे हद्द आणि शिवाजीनगर पुलाचे दुसरे टोक ते थेट शिवाजीनगर परीसर तसेच रेल्वे रूळावरील ओव्हर ब्रिज अशी दोन कामे श्रीश्री इन्फ्रा आणि लोढा नामक एजन्सीज या वेगवेगळया कंपन्यांना देण्यात आले होते. राज्य मंत्र्यानी कामाचे उद्घाटन केल्यानंतर लगेचच दोन तीन दिवसांनतर रेल्वे पुलाचे डांबरीकरण व इतर साहित्य काढण्यासाठीच्या प्रत्यक्ष कामाला श्रीश्री इन्फ्रा कडून सुरूवात देखिल करण्यात आली होती. डांबरीकरणाचे खोदकाम व इतर मटेरिअल काढण्यास सुरूवात केल्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत रेल्वे विभागाने श्रीश्री इन्फा कंपनीचे काम थांबविले आहे. रेल्वे विभागाकडून पुलाचे गडर्स काढण्यासाठी मागविण्यात आलेली अवाढव्य क्रेन उभी करण्यास जागा मिळत नसल्याने किंवा क्रेन उभी करण्यास अडथळा निर्माण होणार असल्याने हे काम लगेचच थांबविण्यात आले आहे.
शहरातील महत्वाचा मार्ग पुलाचे नुतनीकरणामुळे उड्डाणपुल बंद करण्यात आला असल्याने शहरवासीयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरत रेल्वेगेट परीसरातील वाहतुकीवरील ताण आणि यामुळे या दोन ते तीन दिवसात नागरीकांचा बळी देखिल गेला आहे. पुलाच्या उभारणी कामात वारंवार येणारे अडथळे पहाता या बंद करण्यात आलेल्या कामासंदर्भात अधिक माहितीसाठी डिआरएम कार्यालय भुसावळ येथे संपर्क साधला असता याबाबतच अधिकारी वर्गाची बैठक सुरू असल्याचे सांगण्यात आले.हि बैठक रात्री उशीरापर्यत सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.