Monday, January 30, 2023

अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून विनयभंग

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरात  तरुणाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला भररस्त्यात थांबवून विनयभंग करत तिला जिवे मारण्याची धमकी दिली .

‘फक्त माझी आहेस, तू जर माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ या शब्दांत एकतर्फी प्रेमातून कुलदीप रवींद्र सपकाळे (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याने शिवीगाळ करत १७ वर्षीय मुलीला धमकी दिली आहे. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी दुपारी अग्रवाल चौकात घडली आरोपी तरुणाविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कुलदीप काही दिवसांपासून गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. एकतर्फी प्रेमातून तो पीडित मुलीचा अनेकदा पाठलाग करायचा.

- Advertisement -

गुरुवारी पीडित मुलगी मैत्रिणीसोबत कामानिमित्त बाहेर गेली होती. दोन्ही मुली अग्रवाल चौकातून जात असताना, आरोपी कुलदीपने पाठलाग करत पीडित मुलीला भररस्त्यात आडवलं. यावेळी आरोपीनं ‘तू फक्त माझी आहेस, आणि तू माझी झाली नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही’ अशा शब्दांत आरोपीनं पीडित मुलीला धमकी दिली आहे. यावेळी आरोपी पीडित मुलीच्या मैत्रिणीला देखील अश्लील शिवीगाळ केली आहे. दोघींना जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. पीडित मुलीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे