Monday, September 26, 2022

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

जळगाव शहरातील रेल्वे लाईन भागातील  १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शहरातील आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन जवळील आर.एन. दुध संकलन केंद्राजवळ १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून अजय पप्पु सोनकर रा. करंदा ता. मडीहान जि. मिर्झापूर उत्तरप्रदेश ह.मु. आर.एन.दुध संकलन केंद्र जळगाव याने फूस लावून पळवून नेले.

याप्रकरणी पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अजय सोनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल तायडे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या