Thursday, February 2, 2023

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले; गुन्हा दाखल

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने घरातून फूस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी नातेवाईकांकडे शोधाशोध परंतू कोठेही मिळून आली नाही.

- Advertisement -

दरम्यान, अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप केला आहे. तब्बल पंधरा दिवसानंतर मुलगी मिळून न आल्याने अखेर २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय झाल्टे करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे