अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली ; ८८ प्रवासी बचावले

0

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथून अलिबागच्या दिशेने जाणारी प्रवाशी बोट अलिबागमधील मांडवा जेट्टीजवळच बुडाली आहे. आज शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. दरम्यान, या बोटीतील सर्व ८८ प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे.

समुद्रातील एका खडकावर आदळून ही बस उलटल्याची प्राथमिक माहिती आहे. बोट उलटली तेव्हा सुदैवाने जवळच मरिन पोलिसांची गस्ती बोट जवळच होती. त्यामुळे लगेचच मदतकार्य सुरू झाले. काही वेळातच तटरक्षक दलाचे गस्तीपथकही तिथे दाखल झाले. मरिन पोलीस, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमारांनी युद्धपातळीवर बचावकार्य करत सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश मिळवले.बोटीत ८८ प्रवासी होते. या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे. ८ प्रवाशांना तटरक्षक दलाने तर उर्वरित प्रवाशांना मरिन पोलीस आणि स्थानिक मश्चिमारांनी वाचवले.

Leave A Reply

Your email address will not be published.