अर्थव्यवस्थेला फटका; भारतात सोने आयातीत मोठी वाढ, चांदीत घसरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून  भारतातील  सोन्याच्या आयातीत वाढ होणारी वाढ कायम आहे.  एप्रिल-जून तिमाहीत देशातील सोन्याच्या आयातीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे चालू खात्यातील तूट आणखी वाढली असून हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फारसे चांगले लक्षण नाही. तर देशातील चांदी आयातीत मात्र मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

एप्रिल-जून तिमाहीत सोन्याची आयात ७.९ अब्ज डॉलर्सनी वाढून ५८,५७२.९९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यापूर्वी एप्रिल-मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कितीतरी अधिकपट सोन्याची आयात नोंदवण्यात आली होती. भारत हा जगात चीननंतर सोन्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे.

भारतात प्रामुख्याने दागिन्यांसाठी सोन्याचा वापर केला जातो. त्यासाठी दरवर्षी ८०० ते ९०० टन सोने आयात केले जाते. तर दुसरीकडे यंदा चांदीची झळाळी मात्र कमी होताना दिसत आहे. एप्रिल-जून तिमाहीत चांदीची आयात ९३.७ टक्क्यांनी घसरून ३.९१ कोटी डॉलर्स इतकी राहिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.