Wednesday, May 18, 2022

अरे बापरे.. स्थापना दिवसालाच काँग्रेसचा झेंडा पडला खाली (व्हिडीओ)

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

आज काँग्रेसच्या 137 व्या स्थापना दिनी एक अतिशय वाईट बातमी घडली. याला कुणी अपशकून म्हणेल, तर कोणी आणखी काही. मात्र, हे टाळता आले असते.  काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्ष आणि सर्वेसर्वा सोनिया गांधींनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली खरी. मात्र, तो झेंडा त्यांच्याच हातावर येऊन पडला. प्रसंगी सारेच सैरभर झाले.

- Advertisement -

काँग्रेसच्या या ऐतिहासक वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा कार्यक्रम आज होता. मात्र, यावेळी गालबोट लागल्याचे दिसले. सोनिया गांधी यांनी झेंडा फडकावण्यासाठी दोरी ओढली. पक्षाचा झेंडा वर गेला. मात्र, काही क्षणातच तो झेंडा त्यांच्या हातावर येऊन पडला. यामुळे क्षणभर सोनिया गांधी सुद्धा अवाक झाल्या.

त्या ठिकाणी उपस्थित असलेले कर्मचारी आणि कार्यकर्ते सैरभर झाले. मात्र, सोनियांनी संयमाने परिस्थिती हाताळली. यावेळी एक महिला धावत येऊन तिने झेंडा खांद्यावर घेतला.  पुन्हा एकदा रितसर झेंडा फडकावण्यात आला. मात्र, ऐन वर्धापन दिनी ही घटना घडल्याने याची चर्चा चांगलीच रंगलीय.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या