अरे बापरे.. लस घेताना धाय मोकलून रडली महिला (व्हिडीओ)

0

जमुई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या ओमायक्रॉनमुळे देशात चिंतेचे वातावरण पसरले असतांना प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मात्र अनेक ग्रामीण भागात लसीकरण करून घेण्यास नकार दिला जात आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल  होत आहे.

देशभरात कोरोना लसीकरणाबाबात जागरूकता अभियान सुरू आहे. विविध माध्यमांतून हा प्रसार केला जात आहे. बिहारमधील जमुई या गावात लसीकरण मोहीम राबवली जात होती. मात्र त्यावेळी अनेकांनी लस घेण्यास नकार दिला. एका महिलेने लस न घेण्यासाठी रडून रडून आकाश-पाताळ एक केलं. ती ढसा ढसा रडत होती. तिला 4 ते 5 जणांनी पकडलं तेव्हा कुठे लस दिली गेली.

ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यातील सिकंदरा भागातील एका छोट्याशा गावातील आहे. ही महिला लस घेताना प्रचंड घाबरत होती. लस पाहून ती शेतात पळू लागली. शेवटी शेतात काही जणांनी तिला पकडलं.

एकीकडे आरोग्य कर्मचारी इंजेक्शन हातात घेऊन उभी होती, तर दुसरीकडे ही महिला धाय मोकलून रडत होती. हा व्हिडीओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये, तर अनेकांनी हे गंभीर असल्याचं सांगितलं. लोकांच्या मनात लसीबद्दल विश्वास नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट  हळूहळू आटोक्यात येऊ लागलेली असतानाच सर्वत्र तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात होती.

Leave A Reply

Your email address will not be published.