नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 83,883 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,043 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल 38,53,407 वर गेला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 67 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,15,538 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 29,70,493 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.