अरे बापरे.. थेट रेस्टॉरंटमध्ये शिरली म्हैस; पहा नंतर काय झालं (Viral Vedio)

0

बीजिंग

चक्क रेस्टॉरंटमध्ये एक म्हैस घुसल्याने चांगलाच गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. म्हशीच्या हल्ल्याची ही संपूर्ण घटना रेस्टॉरंटमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही घटना चीनमधील आहे.

https://youtu.be/FQ35v4TO2Ms

‘द सन’च्या वृत्तानुसार, ही घटना पूर्व चीनमधील ताईझोउ शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, एक म्हैस अचानक रेस्टॉरंटमध्ये शिरते आणि समोर येणारी प्रत्येक गोष्ट शिंगाने उचलून फेकतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही म्हैस जवळच्याच कत्तलखान्यातून धावत आली होती, जिथे तिला जिवे मारलं जाणार होतें.

मात्र, त्याआधीच ती तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली आणि थेट रेस्टॉरंटमध्ये शिरली. म्हशीच्या या हल्ल्यात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर म्हशीच्या मालकाने जखमींना नुकसान भरपाई देण्याचं मान्य केलं आहे.

मात्र, रेस्टॉरंटमधून पळून गेलेल्या या म्हशीचं काय होणार हे माहीत नाही. म्हशीच्या हल्ल्यात रेस्टॉरंटमधील फर्निचरचंही नुकसान झालं आहे. एका व्यक्तीनं सांगितलं की, म्हशीने हल्ला केला तेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये उपस्थित होता. त्याने एका ग्राहकाला म्हशीच्या पायाखाली येण्यापासून वाचवलं, अन्यथा म्हशीने त्याला चिरडलं असतं.

Leave A Reply

Your email address will not be published.