जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांसह मृत रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जिल्ह्यात ११९६ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यात चोपड्यातील रूग्णांची संख्या ही आता धोकादायक प्रमाणावर गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. चोपडा तालुक्यात तब्बल ३६२ रुग्ण आढळून आले आहे.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर-२५२, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-९९, अमळनेर-९५, चोपडा-३६२, पाचोरा-३०, भडगाव-९, धरणगाव-६७, यावल-३५, एरंडोल-२८, जामनेर-८४, रावेर-२८, पारोळा-२५, चाळीसगाव-४०, मुक्ताईनगर-१, बोदवड-२६, इतर जिल्ह्यातील १० असे एकुण १ हजार १९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे
जिल्ह्यात एकुण ८३ हजार १६५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहे. यापैकी ७० हजार ८७७ रूग्ण बरे हावून घरी परतले आहे. तर १० हजार ७३४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात १५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. नागोराव चव्हाण यांनी माहिती दिली.