जळगाव : जळगाव जिल्हा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालला आहे. 18 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ दोन रुग्ण आढळले होते, पैकी एकाचा मृत्यू झाला होता, तर दुसरा पूर्ण बरा होऊन घरी परतला होता. मात्र, गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढून ती ६२१ वर पोहचली आहे. त्यातही ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून जिल्ह्याचा हा मृत्युदर देशापेक्षा चौपट पटीने जास्त असल्याची बाब समोर आली आहे. देशाचा मृत्यूदर २.८७ टक्के इतका आहे. तर जळगाव जिल्ह्याचा मृत्युदर हा ११. ४९ टक्के इतका आहे. या मृत्यूदराने एकीकडे प्रशासनाची चिंता वाढवली आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील आरोग्य सुविधेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे, किंबहुना हे या आरोग्य यंत्रणेचे अपयशच असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात कोरोणाची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६२१ इतकी आहे. दिलासादायक बाब म्हणजे २३३ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहे. तर ६८ जणांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा हा मृत्युदर देशापेक्षा चौपट पटीने जास्त आहे ही चिंतेची बाब आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपाय योजना राबवित आहे.