जळगाव ;- अयोध्या येथे प्रभू राम लल्ला यांचे 500 वर्षानंतर जन्म ठिकाणी २२ जानेंवारी रोजी विराजमान होणार आहेत.या मंगलमय ऐतिहासिक सोहळ्याचे निमंत्रण म्हणून प्रत्येक हिंदू घरामध्ये अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलशांचे जळगाव मधे आगमन झालेले आहे या.अक्षदा पूजनाचे कार्यक्रमाचे आयोजन दि. 10 डिसे. रविवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन BSNL ऑफिस मागे येथे करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी 11 कुंडी यज्ञाचे आयोजन करण्यात आलेले असून मंगल अक्षतांचे पवित्र वेदमंत्रांचा उद्घोषात पूजन करण्यात येणार आहे. या संपुर्ण धार्मिक विधींचे पौरोहित्य गायत्री परिवाराचे पुरोहित करणार आहेत. हिंदू धर्मातील सर्व ज्ञातींचे तसेच विविध संप्रदायाच्या 101 जोडप्यांचे हस्ते पूजन करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील 15 लाख घरापर्यंत पोहचवून निमंत्रण पत्रिका राम मंदिराची प्रतिमा व मंगल अक्षता देऊन 22 जानेवारी 2024 या दिवशी आपल्या परिसरातील मंदिरात सर्वांनी एकत्रित येवून आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन विश्व हिंदु परिषद तर्फे करण्यात येणार आहे. यासाठी विविध स्तरांवर बैठका घेवून नियोजन पूर्ण झालेले आहे.
मंगल अक्षदा पूजनाचे कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसेच विविध संप्रदायातील महांतांची उपस्थिती राहणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभु श्रीराम यांचे कार्यात सहभागी होण्याचे आवाहन विश्व हिंदू परिषद तर्फे करण्यात आले आहे.