Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शेंदुर्णीत धनसंचयास प्रारंभ !
    जळगाव

    अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी शेंदुर्णीत धनसंचयास प्रारंभ !

    By January 10, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यात सर्व जाती धर्माच्या शेवटच्या घटकांचा समावेश असावा त्यांच्या सर्वांच्या सहकार्यातुनच अयोध्येत प्रभु रामरायाचे भव्य मंदिर निर्माण होणार असुन याचाच भाग म्हणुन शेंदुर्णी तालुक्यात आज श्रीराम मंदिरात विधीवत पुजा अर्चा करत श्रीरामचंद्र देवस्थान शेंदुर्णी यांच्या वतीने  पारळकर परिवाराच्या तर्फे प्रथम सहयोग देण्यात येऊन धनसंचयास प्रारंभ झाला.

    शेंदुर्णीत शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याची परंपरा आहे. सकाळी वि.हि.प.रा.स्व.संघ तसे श्रीराम भक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम मंदिरात पुजा ,आरती करण्यात आली. यावेळी भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात यांनी या अभियानाच्या मागचा उद्देश विषद केला.अयोध्येतील या श्रीराम जन्मभुमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांचे व शेंदुर्णीचे अनोखे नाते असुन महाराज प्रवचनाच्या निमित्ताने शेंदुर्णीत बहुतांश वेळा आलेले असुन त्यांच्या भगिनी शेंदुर्णी शहरातच राहत असल्याचे सांगुन आज श्रीराम मंदिरात या निधीसंचयनाचा प्रारंभ होत असल्या बद्दल आनंद व्यक्त करत सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी या कार्यात सहयोग देण्याचे आवाहन केले.

    यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल ,पारस जैन पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश झंवर,पं.दिनदयाल पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे ह.भ.प.कडोबा महाराज माळी,ह.भ.प.नारायण महाराज हिवाळे, वामनराव फासे,अजय जहागिरदार,शेंदुर्णी तालुका संघ चालक उमाकांत भगत ,नगरसेवक निलेश थोरात, सतिष बारी ,अभियान प्रमुख अतुल पाटील, सहाय्यक अभियान प्रमुख राजेंद्र आस्वार तसेच रा.स्व.संघ,वि.हिं.प.व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तदनंतर शहरातील काही ठिकाणी धनसंचय करण्यात आला असुन १५ जानेवारी पासुन या अभियानास मोठ्या प्रमाणावर सुरुवात होणार असुन सर्व जाती धर्माच्या सहकार्यातुन हे भव्य मंदिर उभारण्यात येणार असुन सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif