नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली असून सर्व पक्षकारांनी त्यांच्याकडील लिखित जबाब न्यायालयात सादर केले आहेत. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईल आणि हाच युक्तिवादाचा शेवट असेल, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले आहे.
Ayodhya Ram Temple-Babri Masjid land case in Supreme Court: Chief Justice of India (CJI) Ranjan Gogoi has refused to take any intervention application in the case. pic.twitter.com/LBia68F4lx
— ANI (@ANI) October 16, 2019
अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज शेवटचा दिवस असू शकतो, असे संकेत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले आहेत. आज या सुनावणीचा 40 वा दिवस आहे. अयोध्या प्रकरणातील सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद 16 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावा, असं सांगण्यात आले आहे. अयोध्या प्रकरणाची सुनावणी अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.