न्यूयॉर्क : करोनानं अमेरिकेत थैमान घातलं आहे. करोनाच्या प्रसाराचा वेग वाढला असून, मृतांची संख्याही धक्कादायक गतीनं वाढत आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेमध्ये जवळपास दोन हजार लोकांचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. अमेरिकेत बळींची संख्या 12 हजारांच्या आसपास पोहोचली असून, सुमारे पावणे चार लाख नागरिक बाधित आहेत. न्यूयॉर्कमध्ये बळींचा आकडा सुमारे चार हजारांनी वाढला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन मार्ग स्वीकारला आहे. तर चीनमध्ये जिथून ‘कोरोना व्हायरस’चा उगम झाला, त्या वुहानमधील लॉकडाऊन ७६ दिवसांनी हटवण्यात आले आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत अमेरिकेत १२७२२ नागरिका़चा मृत्यू झाला आहे.