मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाण यांच्यात वाद जुंपला आहे.
अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादी नेत्या विद्या चव्हाणांना अब्रुनुकसानाची नोटीस पाठवली आहे. विद्या चव्हाणांनी अमृता फडणवीसांचा ‘डॉन्सिंग डॉल’ असा उल्लेख केला होता. यावर आक्षेप घेत अमृता फडणवीसांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानाची नोटीस धाडली आहे.
आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान,
ती आहे @NCPspeaks नेता विद्याहीन चव्हाण ,
आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल,तिने पसरविलेली सगळी विषारी घाण !@Vidyaspeaks मानहानी notice वाच आणि
सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण ! pic.twitter.com/Ydf7Z3aIEy— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 7, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया यांचा विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढलं होते. दरम्यान अमृता फडणवीस यांनी ट्विट केलं आहे.
अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी notice वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!”
दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हणा म्हणाल्या, अमृता फडणवीस यांनी पाठवलेली कोणतीही नोटिस मला मिळाली नाही. विद्या चव्हाण यांनी माफी मागितली तर ठीक आहे अन्यथा मला त्यांच्या घरी सिद्धिविनायकाचा प्रसाद घेऊन जावा लागेल असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहे. तर तसदी घेऊ नका मी दर मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात जाते असे विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता अमृता फडणवीसांच्या कायदेशीर नोटिशीला विद्या चव्हाण काय उत्तर देतात. त्या माफी मागतात की कोर्टाची लढाई लढतात हे बघावं लागणार आहे.